प्रेरणादायी विचार (Motivational Sayings)


प्रेरणादायी विचार

प्रेरणादायक विचारांचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होऊ शकतो, असे विचार आपल्याला आपल्या जीवनात योग्य दिशा, चेतना आणि प्रेरणा देउ शकतात.

म्हणुनच आपल्यासाठी हे आहेत जगातील काही महान व्यक्तींचे प्रेरणादायी विचार-

१. डेल कार्नेगी (Dale Carnegie)

"तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेपेक्षा तुमच्या चारित्र्याची अधिक चिंता करावी. आपल चरित्र म्हणजे आपण जे खरोखरच आहात आणि आपली प्रतिष्ठा म्हणजे केवळ इतरांना जे वाटते की आपण काय आहात."

२. नेपोलियन हिल (Napoleon Hill)

"थांबू नका; हि वेळ 'योग्य' असे कधीच होणार नाही. आपण जिथे उभे आहात तिथुनच प्रारंभ करा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली जि काही साधने आहेत त्यासह कार्याला सुरुवात करा, जसे तुम्ही पुढे जाल तशी तुम्हाला अधिक चांगली साधने सापडतील."

३. श्री रामकृष्ण परमहंस (Shri Ramakrishna Paramahamsa)

"फळांनी भरलेले झाड नेहमीच खाली वाकते. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर दीन आणि नम्र व्हा."

४. स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda)

"आपण तसेच आहोत जसे आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे; म्हणून आपण जे विचार करता त्याबद्दल काळजी घ्या. शब्द हे दुय्यम आहेत. विचार जगतात; ते दूर प्रवास करतात."

५. स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda)

"उद्दीष्ट पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत उठत राहा, जागे राहा आणि थांबू नका."

६. राल्फ वाल्डो इमर्सन (Ralph Waldo Emerson)

"आपल्यामध्ये काय आहे या तुलनेत आपल्या पाठीमागे काय आहे आणि आपल्या समोर काय आहे या क्षुल्लक गोष्टी आहेत."

७. जॉर्ज बर्नार्ड शॉ (George Bernard Shaw)

"काही पुरुष हे गोष्टी जशा आहेत तशाच पाहतात आणि म्हणतात, "का?" मी कधीच नसलेल्या गोष्टींचे स्वप्न पाहतो आणि असे म्हणतो की “असे का नाही?” 

८. सेलिआ लुसे (Celia Luce)

“एखादा छोटासा त्रास हा गारगोटीसारखा असतो. आपल्या डोळ्याच्या अगदी जवळ धराल तर हे संपूर्ण जग भरुन जाते आणि सर्वकाही दृष्टीआड होते. जर त्यास योग्य अंतरावर धराल तर त्याचे परीक्षण करता येते आणि योग्य वर्गीकरण केले जाऊ शकते. जर आपल्या पायांजवळ फेकून द्याल तर ते त्याच्या वास्तविक स्थितिमध्ये पाहिले जाऊ शकते, जसा कि आयुष्यातील वाटेवरचा अजुन एक छोटासा अडथळा.

९. कार्ल बार्ड (Carl Bard)

"जरी कोणीही मागे जाऊन अगदी नवीन सुरुवात करू शकत नसला तरी, कोणीही आतापासून सुरूवात करुन एक नवीन अंत करू शकतो."

१०. आर्ट विलियम्स (Art Williams)

“मी तुम्हाला सांगत नाही की हे सोपे होईल - मी तुम्हाला सांगत आहे की ते फायदेशीर होईल” - आर्ट विल्यम्स

११. विलियम क्लेमेंट स्टोन (W. Clement Stone)

"लोकांमध्ये छोटासा फरक आहे, परंतु त्या छोट्याशा फरकाने खूप मोठा फरक पडतो. छोटा फरक म्हणजे दृष्टीकोन. मोठा फरक म्हणजे तो एकतर सकारात्मक आहे किंवा नकारात्मक आहे.”

१२. थॉमस जेफरसन (Thomas Jefferson)

"या पृथ्वीवर असे काहीही नाही जे मनुष्याला योग्य मानसिक वृत्तीने त्याचे ध्येय साध्य करण्यापासून थांबवू शकते; या पृथ्वीवर असे काहीही नाही जे मनुष्याला चुकीच्या मानसिक वृत्तीने मदत करू शकते"  

१३. जेम्स एलन (James Allen)

"एखादी व्यक्ती आपल्या परिस्थितीची थेट निवड करू शकत नाही, परंतु तो आपले विचार निवडू शकतो, आणि अप्रत्यक्षपणे, नक्कीच, त्याच्या परिस्थितीला आकार देऊ शकतो."

१४. गौतम बुद्ध (Gautam Buddha)

"आपण जे काही आहोत तो याचाच परिणाम आहे की आपण काय विचार केला आहे. मन हेच सर्व काही आहे. आपल्याला काय वाटते आम्ही बनतो. आपण तसेच बनतो जसा आपण विचार करतो."

१५. अँड्र्यू हेंड्रिक्सन (Andrew Hendrixson)

"कोणीही जेव्हा असं काहिही केलं आहे जे महत्वाचं होत तेव्हा ती व्यक्ती शिस्तबद्ध होती."

१६. कोको चॅनेल (Coco Chanel)

"एखाद्या भिंतीचे दरवाजात रुपांतर करण्याच्या आशेने त्याच्यावर प्रहार करण्यात वेळ घालवू नका."

१७. अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein)

"रचनात्मकता म्हणजे बुद्धिमान व्यक्ती मजा करत आहे."

१८. ब्रायन ट्रेसी (Brian Tracy)

"इतर कोणत्याही गुणांपेक्षा आशावाद ही यश आणि आनंदाशी संबंधित एक गुण आहे."

१९. ग्रेस कोड्डिंग्टन (Grace Coddington)

"नेहमी डोळे उघडे ठेवा. लक्ष ठेवा. कारण आपण जे काही पाहता ते आपल्याला प्रेरणा देऊ शकते."

२०. हेन्री डेव्हिड थोरो (Henry David Thoreau)

"आपणास आपले ध्येय साध्य करून जे काही मिळेल ते तितके महत्त्वाचे नाही जितके आपण आपले ध्येय साध्य करून बनता."

२१. अज्ञात लेखक (Author Unknown)

"जर योजना कार्यान्वित होत नसेल तर ति योजना बदला, परंतु ध्येय कधीही नाही."

२२. थीक न्याह्त हां (Thich Nhat Hanh)

"आनंदापर्यंत जाण्याचा कोणताही मार्ग नाही. आनंद हाच एक मार्ग आहे."

२३. अज्ञात लेखक (Author Unknown)

"आयुष्यातील सुखद क्षेत्र हे एक सुंदर ठिकाण आहे, परंतु तेथे कधीच कोणत्याही गोष्टीची वाढ होत नाही."

२४. अर्ल नाइटिंगेल (Earl Nightingale)

"तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी जरी वेळ लागत असेल तरीही हार मानू नका, वेळ कसाच निघून जाईल."

२५. सेठ गोडिन (Seth Godin)

"जर तुम्हाला त्याची भिती वाटते तर त्यासाठी प्रयत्न करणे ही कदाचित चांगली गोष्ट असू शकते."

२६. एस्टी लॉडर (Estee Lauder)

"मी कधीच यशाची स्वप्ने पाहिली नाहीत. मी त्यासाठी प्रयत्न केले."

२७. अज्ञात लेखक (Author Unknown)

"अपयश टाळणे हे प्रगती टाळण्यासारखे आहे."

२८. मोहनदास करमचंद [महात्मा] गांधी (Mohandas Karamchand Gandhi)

"माणूस बहुतेक वेळेस तसाच बनतो जसा त्याला विश्वास असतो कि तो आहे. मी जर स्वतःला असे म्हणत राहिलो की मी एखादी विशिष्ट गोष्ट करू शकत नाही, तर हे शक्य आहे की मी ती गोष्ट करण्यास खरंच असमर्थ ठरेन. त्याउलट, मला जर असा विश्वास आहे की मी ती करू शकतो, तर जरीही ती क्षमता सुरुवातीस माझ्याकडे नसली तरीही मी ती करण्यासाठीची क्षमता नक्कीच प्राप्त करेन ."

२९. माया एंजेलो (Maya Angelou)

"मी असं शिकलो आहे की आपण काय बोललात हे लोक विसरतील, लोक आपण काय केले ते विसरतील, परंतु आपण त्यांना जी जाणीव करून दिली आहे ती हे लोक कधीही विसरणार नाहीत."

३०. व्हिन्स लोम्बार्डी (Vince Lombardi)

"परिपूर्णता प्राप्त करणे शक्य नाही, परंतु आपण परिपूर्णतेचा पाठपुरावा केल्यास आपण उत्कृष्टता प्राप्त करू शकतो."


अशी आशा आहे कि हे विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेरणा देतील.

Comments