ध्येयासाठी हेतू निश्चित करा



हेतू, ध्येय आणि लक्ष्य निश्चित करणे किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वांनीच ऐकले आहे.

शक्तिशाली ध्येये आपल्याला स्फूर्ती देतात तर स्पष्ट हेतू हे आपल्याला उत्साह देतात आणि पुढे खेचत आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवतात.

एका सुस्पष्ट हेतूशिवाय, आपण अभिक्रियाशील होतो आणि जेव्हा आपल्याला एखादी महत्त्वाची गोष्ट करायची इच्छा असली तरी आपण त्याच्या आसपासही पोहोचत नाही. त्याऐवजी, आपण आपला वेळ वेगळ्याच गोष्टींशी लढण्यात वाया घालवितो.

स्पष्ट हेतू नसल्यास, काहीही होऊ शकते. आणि सहसा असेच होते.

शब्दशः, हेतू हे आपल्या कारच्या स्टीयरिंगसारखे असतात. आपल्या मार्गाचे नियंत्रण आपल्याकडे देणे हाच त्यांचा संपूर्ण उद्देश्य असतो. परंतु हेतू किंवा लक्ष्य निश्चित करताना हे लक्षात ठेवा की आपण जर त्यांचे योग्य मापन करू शकला नाहीत तर आपण ते योग्यरित्या व्यवस्थापित करू शकत नाही.

आता, एकापेक्षा जास्त स्तरांत हेतू असणे हि चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण “माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या कल्याणासाठी योगदान देईन” यासारख्या अधिक वैचारिक हेतूंकडे वळतो तेव्हा हे एखाद्या कर्मविधानासारखे आहे.

परंतु मग, याची खात्री करा की आपण पुढे जाऊन दैनंदिन जीवनात आपल्या कार्याची अंमलबजावणी करण्यासाठी कसे निर्णय घेणार हे ठामपणे ठरवाल. ठामपणा हा निश्चितपणे खूपच आवश्यक आहे. 


आपण आज आपले ध्येय कार्यान्वित कराल का? आपण आपल्या सर्वोच्च हेतूबद्दल प्रत्यक्षात काय कराल?

आपले ध्येय गाठण्यासाठी हेतू ठरविणे अतिशय महत्वाचे आहे. असं म्हणा की “मी ह्या आणि ह्या गोष्टी करणार आहे”. तर ती अशी कोणतीही वेगळी, मोठी आणि असाध्य अशी गोष्ट नसावी, ती फक्त आपण बनवू किंवा अल्प-मुदतीसाठी प्राप्त करू इच्छित असलेली छोटीशी सहजसाध्य गोष्ट असावी. जे काही कराल ते सर्व एखाद्या कागदावर लिहून काढा. जर आपण ते सर्व सूचीबद्ध कराल तर नंतर आपण स्पष्टपणे आपल्या परिणामांकडे पाहून स्वतःची प्रगती तपासू शकता.

आज दिवसाच्या शेवटी किंवा पुढच्या आठवड्यात याच वेळेस, आपण जे करायचं ठरवलं होतं ते केलं आहे का?  अशा प्रकारे विचार कराल, तर हे स्पष्ट होईल की आपण स्वतः स्वतःचीच एक प्रामाणिक तपासणी करण्याची प्रक्रिया तयार करत आहात.

जेव्हा आपण सुरुवातीला अशा प्रकारचे कौशल्य प्राप्त कराल तेव्हा स्वतःवर जास्त दबाव आणू नका. निश्चितच, आपल्या आयुष्याचं एक नवीन पान उलगडताना उत्सुक होणे साहजिक आहे, परंतु आपण आता जिथे आहात तिथूनच प्रारंभ करणे आवश्यक आहे, तिथून नाही जिथे आपल्याला असावे असे वाटते.

इथे अशाही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अनुभवावरून आधीच माहित आहेत की त्या आपण करू शकता. त्या गोष्टी साध्य करण्याचा आपला हेतू निश्चित करा आणि त्या साध्य करा आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही अशा गोष्टी सहजतेने आणि आरामात करू शकता तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयांचा आणि हेतुंचा हळूहळू आणि वेळोवेळी विस्तार करा.

परंतु कोणत्याही नवीन पथ्याप्रमाणेच सुलभ सुरुवात करा. आपण प्रत्यक्षात जे करू शकता त्यापासूनच सुरुवात करा, आणि हेतू व्यवस्थापन प्रक्रियेत सहजता आल्यानंतरच आपण पुढील वाटचालीस सुरुवात करा. 

संयम, जसे कि लहान आणि मोजून मापून पावले उचलणे हे इथे सद्गुणांपेक्षा सरस आहे. स्वतःला प्रगतिशील ठेवण्याची ही गुरुकिल्ली आहे. लक्षात घ्या मी इथे संयम म्हणतोय, दिरंगाई नाही.

त्याऐवजी जर आपण खूप लवकर खूप प्रयत्न केलात तर त्यांचा शेवटचा परिणाम हा कदाचित अनुत्साह आणि निराशा असेल.

म्हणूनच आपण तार्किकपणे आणि हळूहळू मार्गक्रमण करा. पुढच्या वर्षी आपण ज्या पातळीवर पोहोचू इच्छिता त्या पातळीवर लक्ष ठेवा आणि आजच्या प्रयत्नांमधून तेथे पोहोचण्याचा एक मार्ग प्रस्थापित करा. असे केल्यास आपल्याला वास्तविक आणि आवश्यक तेवढी प्रगती प्राप्त होईल; त्याचबरोबर तुम्हाला खरच स्वतःचा अभिमान वाटेल अशी कामगिरी दिसून येईल.

खरोखरच ह्या सर्व अगदी सोप्या गोष्टी आहेत. आपला शब्द आपणच पाळा आणि स्वतःच स्वतःला प्रशिक्षित करा. संयम बाळगा आणि प्रयत्न करत राहा.

मेहनतीला पर्याय नाही.

Comments