प्रेरणा (Motivation)



प्रेरणा

आपण आपले कार्य पूर्ण करण्यासाठी पुरेसे प्रेरणादायी आहात का? पुरेशी प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी त्यावर केंद्रित खूप सारी संसाधने आपल्याकडे उपलब्ध आहेत. 

आपल्या जीवनात प्रेरणा असणे आवश्यक आहे, तरीही ती इतकी सहज शक्य नाही. एकवेळ आपण त्यासाठी खूप प्रयत्न करता तर पुढच्या क्षणी, आपल्याला काहीही करणे आवडत नाही.

खरंच प्रेरणा ही संकल्पना आत्मसात करणं एवढं कठीण आहे का?


प्रेरणा म्हणजे काय?

प्रेरणा म्हणजे आपल्या मनातील एक उत्कट भावना, जी आपल्या इच्छा, आकांक्षा, आवड, गरज आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेला उत्तेजना देते.

प्रेरणा हे एक ध्येय-निर्देशित वर्तन आहे.


प्रेरणा चे तीन घटक:

१. दिशा: एखादी व्यक्ती काय करण्याचा प्रयत्न करीत आहे.

२. प्रयत्न: एखादी व्यक्ती किती कठोर प्रयत्न करीत आहे.

३. चिकाटी: एखादी व्यक्ती किती वेळ प्रयत्न करीत राहते.


प्रेरणा कुठून येते?

प्रेरणा ही एक विचित्र संकल्पना आहे. आपण बर्‍याच गोष्टींनी प्रेरित होतो. आपण तेव्हा प्रेरित होतो जेव्हा आपण उत्साहित असतो, जेेव्हा आपण घाबरलेले असतो आणि जेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी दृढनिश्चयी असतो. असे वाटते की बर्‍याच वेळा एखादि गोष्ट करण्याची इच्छाशक्ती हि नैसर्गिकरित्या येते परंतु जेव्हा आपण सक्रियपणे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हिच प्रेरणा एखाद्या मृगजळाप्रमाणे स्वतःला दुर्मिळ बनवते.


प्रेरणेचे दोन प्रमुख प्रकार -

1. आंतरिक प्रेरणा

या प्रकारामध्ये एखादी व्यक्ती हि अंतर्गत इच्छेद्वारे प्रेरित होते आणि त्या इच्छापूर्तीसाठी कठोर मेहनत घेते आणि त्यामुळे पुरस्कृत झाल्यावर समाधानी होते.

आंतरिक प्रेरणा हि खूपच शक्तिशाली असते.


2. बाह्य प्रेरणा

या प्रकारामध्ये बाह्य इच्छा किंवा बाह्य बक्षीसांद्वारे एखाद्या व्यक्तीस प्रेरित केले जाते त्यामुळे हि बाह्य प्रेरणा आहे.


खाली नमूद केलेले प्रेरणेचे इतर काही प्रकार जे वरील दोन मुख्य प्रकारांमध्ये मोडतात -

  • पुरस्कार आधारित प्रेरणा किंवा प्रोत्साहन प्रेरणा
  • भीती आधारित प्रेरणा
  • उपलब्धि आधारित प्रेरणा
  • शक्ती आधारित प्रेरणा
  • संबद्धता आधारित प्रेरणा
  • क्षमता आधारित प्रेरणा
  • वृत्ती आधारित प्रेरणा

Comments