Posts

प्रेरणा (Motivation)

Image
प्रेरणा आपण आपले कार्य पूर्ण करण्यासाठी पुरेसे प्रेरणादायी आहात का? पुरेशी प्रेरणा प्राप्त व्हावी यासाठी त्यावर केंद्रित खूप सारी संसाधने आपल्याकडे उपलब्ध आहेत.  आपल्या जीवनात प्रेरणा असणे आवश्यक आहे, तरीही ती इतकी सहज शक्य नाही. एकवेळ आपण त्यासाठी खूप प्रयत्न करता तर पुढच्या क्षणी, आपल्याला काहीही करणे आवडत नाही. खरंच प्रेरणा ही संकल्पना आत्मसात करणं एवढं कठीण आहे का? प्रेरणा म्हणजे काय? प्रेरणा म्हणजे आपल्या मनातील एक उत्कट भावना, जी आपल्या इच्छा, आकांक्षा, आवड, गरज आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जेला उत्तेजना देते. प्रेरणा हे एक ध्येय-निर्देशित वर्तन आहे. प्रेरणा चे तीन घटक: १. दिशा: एखादी व्यक्ती काय करण्याचा प्रयत्न करीत आहे. २. प्रयत्न: एखादी व्यक्ती किती कठोर प्रयत्न करीत आहे. ३. चिकाटी: एखादी व्यक्ती किती वेळ प्रयत्न करीत राहते. प्रेरणा कुठून येते? प्रेरणा ही एक विचित्र संकल्पना आहे. आपण बर्‍याच गोष्टींनी प्रेरित होतो. आपण तेव्हा प्रेरित होतो जेव्हा आपण उत्साहित असतो, जेेव्हा आपण घाबरलेले असतो आणि जेव्हा आपण एखाद्या ध्येयासाठी दृढनिश्चयी असतो. असे वाटत

ध्येयासाठी हेतू निश्चित करा

Image
हेतू, ध्येय आणि लक्ष्य निश्चित करणे किती महत्त्वाचे आहे हे आपण सर्वांनीच ऐकले आहे. शक्तिशाली ध्येये आपल्याला स्फूर्ती देतात तर स्पष्ट हेतू हे आपल्याला उत्साह देतात आणि पुढे खेचत आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचवतात. एका सुस्पष्ट हेतूशिवाय, आपण अभिक्रियाशील होतो आणि जेव्हा आपल्याला एखादी महत्त्वाची गोष्ट करायची इच्छा असली तरी आपण त्याच्या आसपासही पोहोचत नाही. त्याऐवजी, आपण आपला वेळ वेगळ्याच गोष्टींशी लढण्यात वाया घालवितो. स्पष्ट हेतू नसल्यास, काहीही होऊ शकते. आणि सहसा असेच होते. शब्दशः, हेतू हे आपल्या कारच्या स्टीयरिंगसारखे असतात. आपल्या मार्गाचे नियंत्रण आपल्याकडे देणे हाच त्यांचा संपूर्ण उद्देश्य असतो. परंतु हेतू किंवा लक्ष्य निश्चित करताना हे लक्षात ठेवा की आपण जर त्यांचे योग्य मापन करू शकला नाहीत तर आपण ते योग्यरित्या व्यवस्थापित करू शकत नाही. आता, एकापेक्षा जास्त स्तरांत हेतू असणे हि चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण “माझ्या आजूबाजूच्या लोकांच्या कल्याणासाठी योगदान देईन” यासारख्या अधिक वैचारिक हेतूंकडे वळतो तेव्हा हे एखाद्या कर्मविधानासारखे आहे. परंतु मग, याची खात्री करा की आपण पुढे जाऊन द

प्रेरणादायी विचार (Motivational Sayings)

Image
प्रेरणादायी विचार प्रेरणादायक विचारांचा आपल्या सर्वांना नक्कीच फायदा होऊ शकतो, असे विचार आपल्याला आपल्या जीवनात योग्य दिशा, चेतना आणि प्रेरणा देउ शकतात. म्हणुनच आपल्यासाठी हे आहेत जगातील काही महान व्यक्तींचे प्रेरणादायी विचार- १. डेल कार्नेगी (Dale Carnegie) "तुम्ही तुमच्या प्रतिष्ठेपेक्षा तुमच्या चारित्र्याची अधिक चिंता करावी. आपल चरित्र म्हणजे आपण जे खरोखरच आहात आणि आपली प्रतिष्ठा म्हणजे केवळ इतरांना जे वाटते की आपण काय आहात." २. नेपोलियन हिल (Napoleon Hill) "थांबू नका; हि वेळ 'योग्य' असे कधीच होणार नाही. आपण जिथे उभे आहात तिथुनच प्रारंभ करा आणि आपल्याकडे उपलब्ध असलेली जि काही साधने आहेत त्यासह कार्याला सुरुवात करा, जसे तुम्ही पुढे जाल तशी तुम्हाला अधिक चांगली साधने सापडतील." ३. श्री रामकृष्ण परमहंस (Shri Ramakrishna Paramahamsa) "फळांनी भरलेले झाड नेहमीच खाली वाकते. जर तुम्हाला महान व्हायचं असेल तर दीन आणि नम्र व्हा." ४.  स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) "आपण तसेच आहोत जसे आपल्या विचारांनी आपल्याला बनवले आहे; म्हणून आपण जे विचार करता त

यशस्वी (Successful) होण्याचं रहस्य

Image
यशस्वी होण्यासाठी काय आवश्यक आहे?   तुम्ही जर आजूबाजूला विचाराल तर आपल्याला यशस्वी होन्यासाठीची भिन्न भिन्न उत्तरे सापडतील. सत्य हे आहे की, यश हे आपल्याला वेळोवेळी काही संकेत दाखवत असते आणि सामान्य गुण आणि तत्त्वे यांचे पालन करून आपण इच्छित क्षेत्रातील यश मिळवू शकता. ते सोपे असतात आणि सामान्य ज्ञान मानले जातात परंतु बहुतेक लोक त्यांचे अनुसरण करीत नाहीत. यशस्वी होण्यासाठी योग्य तयारी, कठोर परिश्रम आणि अपयशातून शिकणे आवश्यक आहे. आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणात यश मिळवण्यासाठी तीन मुख्य घटक आहेतः १. तयारी आपल्याला प्रत्येक गोष्ट परिपूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही.  पहिल्या चरणातून प्रारंभ करा आणि पुढे चालत रहा.  यश हे एका रात्रीत मिळत नाही.  तयारी करा आणि करत रहा.  इच्छित यश मिळविण्यासाठी आपण तयार असणे आवश्यक आहे. आपण जे ध्येय ठरवले आहे त्याकडे आपले लक्ष केंद्रित करा, कार्य करत रहा आणि त्या क्षणाची तयारी करा जेव्हा योग्य संधी आपला दरवाजा ठोठावेल. २. कठीण परिश्रम यशासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत. कोणतेही यश हे चुटकीसरशी मिळत नाही. ‘Get Rich Quick’ अशा योजनांच्या मागे धावू नका.